मोठी बातमी : संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी

मोठी बातमी : संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी

| Updated on: Apr 01, 2023 | 10:19 AM

Sanjay Raut Death Threats : शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सिद्धू मुसेवालाप्रमाणे AK 47 ने ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून संजय राऊत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकीचा स्क्रीनशॉट टीव्ही 9 च्या हाती लागला आहे. लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सिद्धू मुसेवालाप्रमाणे AK 47 ने ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकी देणारी व्यक्ती पुण्यातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. “दिल्लीत भेट, तुला Ak 47 ने उडवतो. सलमान खान आणि तुझा गेम फिक्स आहे”, असं या धमकीत म्हणण्यात आलं आहे.

Published on: Apr 01, 2023 09:52 AM