VIDEO | Sanjay Raut यांचं Raj Thackeray यांना प्रत्युत्तर

VIDEO | Sanjay Raut यांचं Raj Thackeray यांना प्रत्युत्तर

| Updated on: May 02, 2022 | 12:24 PM

रावण हुशार आणि विद्वान योद्धा होता. तो अहंकाराने गेला. काही लोकांना सत्ता असल्याचा अहंकार असतो, तर काहींना सत्ता गमावल्यातूनही वेगळा अहंकार निर्माण होतो. आता कोणत्या अहंकारातून कोण कुणाला रावण म्हणतो हे पाहिलं पाहिजे. विरोधी पक्षाच्या अंगात जो रावण  संचारला आहे. त्यांनी त्याचा अंत करावा आणि मग महाराष्ट्राच्या प्रश्नावर बोलावं, अशी खरमरीत टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे.

ज्यांनी हे वक्तव्य केलं आहे. ते चुकीचं बोलत आहेत. त्यांनी रामायण वाचलं पाहिजे. रावणाचाही इतिहास पाहिला पाहिजे. रावणाचा अंत अहंकारामुळे झाला. रावण हुशार आणि विद्वान योद्धा होता. तो अहंकाराने गेला. काही लोकांना सत्ता असल्याचा अहंकार असतो, तर काहींना सत्ता गमावल्यातूनही वेगळा अहंकार निर्माण होतो. आता कोणत्या अहंकारातून कोण कुणाला रावण म्हणतो हे पाहिलं पाहिजे. विरोधी पक्षाच्या अंगात जो रावण  संचारला आहे. त्यांनी त्याचा अंत करावा आणि मग महाराष्ट्राच्या प्रश्नावर बोलावं, अशी खरमरीत टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. काल भाजपची सोमय्या मैदानावर सभा झाली. यावेळी भाजप नेत्यांनी शिवसेनेला रावणाची उपमा देऊन सेनेवर जोरदार हल्ला चढवला होता. याबाबत राऊत यांना सवाल केला असता त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला.