गायक सोनू निगमच्या वडिलांच्या घरी 72 लाखांची चोरी, 24 तासात आरोपी अटकेत
Singer Sonu Nigam : गायक सोनू निगमच्या वडिलांच्या घरी 72 लाखांची चोरी झाली आहे. ही चोरी करणाऱ्या आरोपीस 24 तासात ओशिवारा पोलिसांनी अटक केली आहे.
मुंबई : गायक अभिनेता सोनू निगम याच्या वडिलांच्या घरी 72 लाखांची चोरी झाली. सोनू निगम याची बहिण सुनीता निगम हीने याप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.या तक्रारीनुसार ओशिवरा पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंद करून तपासास सुरुवात करून अवघ्या 24 तासात आरोपीस अटक केली आहे. त्याच्याकडून कोल्हापूर येथून 70 लाख रुपयेही जप्त करण्यात आले आहेत. सध्या आरोपीला नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव रमजान मुजावर असून तो निगम यांच्या घरी वाहन चालक म्हणून काम करत होता. मात्र आठ महिन्यापूर्वीच त्याने नोकरी सोडली होती. रमजान मुजावरला आता अटक करण्यात आली आहे.
Published on: Mar 25, 2023 08:24 AM
Latest Videos