रिया चक्रवर्तीला कोर्टाकडून दिलासा, परदेशात जाण्यासाठी मिळाली परवानगी
अभिनेत्री रिया चक्रवर्तीला मुंबई कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाशी संबंधित ड्रग्ज प्रकरणातील ती आरोपी आहे. न्यायालयाने तिला सशर्त परदेशात जाण्याची परवानगी दिली आहे.
अभिनेत्री रिया चक्रवर्तीला मुंबई कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाशी संबंधित ड्रग्ज प्रकरणातील ती आरोपी आहे. न्यायालयाने तिला सशर्त परदेशात जाण्याची परवानगी दिली आहे. ड्रग्जप्रकरणी तिला एनसीबीने अटक केली होती. त्यानंतर तिचा पासपोर्टही जमा करण्यात आला होता. रियाला अबुधाबी याठिकाणी एका पुरस्कार सोहळ्यासाठी जायचं आहे. त्यासाठी तिने कोर्टाकडून परवानगी घेतली.
Latest Videos