टॅक्सी, रिक्षा चालक संपावर ठाम? उदय सामंत यांच्यासोबत आज बैठक, मागण्या मान्य होणार?
रिक्षा आणि टॅक्सी चालकांना इंधन दरवाढीसोबत महागाईच्या झळा बसत आहेत. त्यामुळे भाडेवाढ करावी, अशी मागणी टॅक्सी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली होती. अखेर संपावर जाण्याचा इशाराही टॅक्सी चालकांनी दिलेला.
मुंबई : भाडेवाढीच्या मागणीसाठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी (Mumbai Auto Rikshaw and Taxi Owners) आक्रमक पवित्रा घेतलाय. 26 सप्टेंबरपासून संपावर जाण्याचा इशारा रिक्षा, टॅक्सी चालकांनी (Auto, Taxi Strike) दिलाय. दरम्यान, त्याआधी या संपावर तोडगा निघतो की नाही, यासाठी आज एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. उदय सामंत (Uday Samant) यांची टॅक्सी असोसिएशन आणि रिक्षा युनियनच्या पदाधिकाऱ्यांसोबत आज बैठक होणार आहे. या बैठकीत रिक्षा, टॅ्सी चालकांच्या मागण्या पूर्ण होतात का, हे पाहणं महत्त्वाचंय. रिक्षा आणि टॅक्सी चालकांना इंधन दरवाढीसोबत महागाईच्या झळा बसत आहेत. त्यामुळे भाडेवाढ करावी, अशी मागणी टॅक्सी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली होती. अखेर संपावर जाण्याचा इशाराही टॅक्सी चालकांनी दिलेला. त्याला रिक्षा चालक संघटनांनीही पाठिंबा दिला होता. मात्र रिक्षा, टॅक्सी चालकांच्या मागण्यांबाबत शिंदे सरकारने सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी काहीशी माघार घेतली होती. मात्र अद्याप ठोस कोणताही निर्णय न झाल्यानं आता पुन्हा एकदा रिक्षा, टॅक्सी चालक संघटनेनं 26 सप्टेंबरपासून संपावर जाण्याचं इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर आज उदय सामंत यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत रिक्षा, टॅक्सी चालकांच्या प्रलंबित मागण्या मान्य होतात का, हे पाहणं महत्त्वाचंय.