विधानपरिषद निवडणुकीत महायुतीत वितुष्ट येणार? नेमकं कारण काय?

विधानपरिषद निवडणुकीत महायुतीत वितुष्ट येणार? नेमकं कारण काय?

| Updated on: Jun 12, 2024 | 1:13 PM

विधानपरिषद निवडणुकीत महायुतीमध्ये वितुष्ट निर्माण होणार का? असा सवाल सध्या केला जात आहे. कारण मुंबई शिक्षक मतदारसंघ आणि मुंबई पदवीधर मतदारसंघात भाजप एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांच्यात चुरशीची लढत होताना दिसणार आहे.

विधानपरिषद निवडणुकीत महायुतीमध्ये वितुष्ट निर्माण होणार का? असा सवाल सध्या केला जात आहे. याला कारण ही तसंच आहे. मुंबई शिक्षक मतदारसंघ आणि मुंबई पदवीधर मतदारसंघात भाजप एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांच्यात चुरशीची लढत होताना दिसणार आहे. दरम्यान, आजचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे. मुंबई शिक्षक मतदारसंघात भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार हे आमने-सामने आले आहेत. तर मुंबई पदवीधर मतदारसंघात भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामना रंगताना दिसणार आहे. अजित पवार गटाकडून शिवाजीराव नलावडे. भाजप पुरस्कृत शिक्षक परिषदेचे शिवनाथ दराडे हे विरोधात आहेत. दुसरीकडे पदवीधर मतदारसंघात शिंदे गटाचे दीपक सावंत आणि भाजपच्या किरण शेलार यांच्या लढाई होणार आहे. या सगळ्यामध्ये जर महायुतीमध्ये वितुष्ट झाल्यास त्याचा थेट फायदा हा ठाकरे गट आणि शिक्षक भारती संघटनेला होण्याची शक्यता आहे.

Published on: Jun 12, 2024 01:13 PM