मुंबईत थंडीचा जोर कायम, पारा 19 अंश सेल्सिअसवर
मुंबईत थंडीचा जोर आजही कायम आहे, शहरातील तापमान 19 अंश सेल्सिअस इतकं नोंद झालंय. गेल्या पाच दिवसांपासून मुंबईत धूरकट वातावरण आहे, आजही ते कायम आहे. हवेचा गुणवत्ता निर्देशांक 170 वर पोहोचलाय.
मुंबईत थंडीचा जोर आजही कायम आहे, शहरातील तापमान 19 अंश सेल्सिअस इतकं नोंद झालंय. गेल्या पाच दिवसांपासून मुंबईत धूरकट वातावरण आहे, आजही ते कायम आहे. हवेचा गुणवत्ता निर्देशांक 170 वर पोहोचलाय. पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र या ठिकाणी थंडीची लाट येणार आहे. तापमान 8 अंशापर्यंत जाणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी घट होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय. त्यामुळे या कडाक्याच्या थंडीच्या दिवसात लहान मुले आणि वृद्ध नागरिकांना विशेष काळजी घ्यावी लागणार असल्याचे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
Latest Videos