Mumbai Unlock | मुंबई अनलॉक, पाहा काय सुरु काय बंद?

Mumbai Unlock | मुंबई अनलॉक, पाहा काय सुरु काय बंद?

| Updated on: Aug 16, 2021 | 10:03 AM

आजपासून मुंबईतील सर्व मैदाने, उद्याने, चौपट्या, समुद्र किनारे खुली झाली आहेत. सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत या सर्व गोष्टी खुल्या ठेवण्याचा निर्णय बृहन्मुंबई महागरपालिकेने घेतला आहे. परंतु हा निर्णय घेताना महापालिकेने नियम आणि अटींचं बंधन घातलं आहे, जे नागरिकांना पाळावं लागणार आहे.

आजपासून मुंबईतील सर्व मैदाने, उद्याने, चौपट्या, समुद्र किनारे खुली झाली आहेत. सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत या सर्व गोष्टी खुल्या ठेवण्याचा निर्णय बृहन्मुंबई महागरपालिकेने घेतला आहे. परंतु हा निर्णय घेताना महापालिकेने नियम आणि अटींचं बंधन घातलं आहे, जे नागरिकांना पाळावं लागणार आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि इतर उपाययोजना अनिवार्य राहतील. कोव्हिडची दुसरी लाट आटोक्यात येत आहे. त्याच अनुषंगाने ब्रेक द चेन अंतर्गत आपण मुंबईत शिथिलता देत असल्याचं महापालिकेने म्हटलं आहे. मैदाने, उद्याने, चौपट्या, समुद्र किनारे सुरु राहतील पण यांसाठी वेगवेगळे नियम करण्यात आले आहेत, जे नियम पाळणं नागरिकांना अनिवार्य असेल.