वसईत माणुसकीची हत्या! तरुणीवर लोखंडी पान्याने सपासप वार, बघणारे बघत राहिले अन् तिने प्राण सोडला

वसईत माणुसकीची हत्या! तरुणीवर लोखंडी पान्याने सपासप वार, बघणारे बघत राहिले अन् तिने प्राण सोडला

| Updated on: Jun 18, 2024 | 5:13 PM

वसईमध्ये तरूणीची भररस्त्यात निर्घृण हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे आरोपीने हत्या करतानाचा लाईव्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

वसईमध्ये तरूणीची भररस्त्यात निर्घृण हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे आरोपीने हत्या करतानाचा लाईव्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वसई पूर्व चिंचपाडा परिसरात आज सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. आरती यादव (वय 20) असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव असून, रोहित यादव असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. लोखंडी पाना डोक्यात मारून आरोपीने ही हत्या केली आहे. हत्या करताना बघ्याची गर्दी ही मोठ्याप्रमाणात होती पण कोणीही त्या तरूणीच्या मदतीसाठी धावून गेले नाही, असे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओ मधून बघायला मिळत आहे. सध्या आरोपीला वालीव पोलिसांनी ताब्यात घेतले असून घटनास्थळाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

 

Published on: Jun 18, 2024 05:11 PM