मुंबईकरांचा प्रामाणिकपणात पाहा कितवा नंबर, पुणेकर ऐकून हसतील की मनात जळतील?

मुंबईकरांचा प्रामाणिकपणात पाहा कितवा नंबर, पुणेकर ऐकून हसतील की मनात जळतील?

| Updated on: May 14, 2023 | 1:20 PM

VIDEO | 'मुंबईकरांचा प्रामाणिकपणात कितवा नंबर, मुंबईकरांनो तुम्हाला हे पटतंय का?

मुंबई : मुंबई म्हणजे स्वप्नांची नगरी…मुंबईमध्ये नोकरी करणं आणि लहानसं का होईना घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. या मुंबईसारख्या शहरात कित्येक लोकं आपलं पोट भरण्यासाठी येतात. मात्र तुम्हाला माहित आहे का? मायानगरी मुंबई जगातील दुसऱ्या क्रमांकाचे प्रामाणिक शहर म्हणून समोर आली आहे. रिडर्स डायजेस्ट मासिकाने केलेल्या अहवालातून हे स्पष्ट करण्यात आले आहे. हादसों का शहर म्हणून ओळख असलेल्या मुंबईची अशीही ओळख आहे. जगातील विविध शहरांमधील नागरिकांच्या प्रामाणिकपणाची पडताळणी करण्यासाठी, अमेरिकेतील प्रसिद्ध इंग्रजी मासिक ‘रिडर्स डायजेस्ट’ने १६ मोठ्या शहरांमधील रस्त्यांवर पैशांनी भरलेली १९२ पाकिटे सोडून एक अनोखे सर्व्हेक्षण केले. यामध्ये फिनलॅण्डची राजधानी असलेल्या हेलसिंकीने जगातील पहिल्या क्रमांकाचे प्रामाणिक शहर असल्याचा बहुमान पटकावला, तर भारताची आर्थिक राजधानी असलेली मुंबई जगातील दुसऱ्या क्रमांकाचे प्रामाणिक शहर ठरले. हलसिंकीमधील नागरिकांनी पैसे असलेली ११ पाकिटे परत आणून दिली तर मुंबईमधील नागरिकांनी १२ पैकी नऊ पाकिटे परत आणून दिली. त्यामुळे मुंबई जगातील दुसऱ्या क्रमांकाचे प्रामाणिक शहर ठरले.. लिस्बनमधील नागरिकांनी १२ पैकी अवघे १ पाकिट परत आणून दिल्यामुळे हे शहर जगातील प्रामाणिक शहरांच्या यादीत शेवटच्या स्थानावर आहे.

Published on: May 14, 2023 01:20 PM