Mumbai Water Cut : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, ‘या’ भागात पाणी पुरवठा राहणार बंद

Mumbai Water Cut : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, ‘या’ भागात पाणी पुरवठा राहणार बंद

| Updated on: Dec 15, 2023 | 12:25 PM

मलबार हिल जलाशयातील कप्पा क्रमांक १ ची अंतर्गत पाहणी करण्यात येणार असून या जलाशयाचा कप्पा क्रमांक १ पूर्णपणे रिक्त करण्यात येणार आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईतील महापालिकेच्या हद्दीतील काही भागात १८ डिसेंबर रोजी १० टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.

मुंबई, 15 डिसेंबर 2023 : मुंबई महापालिकेच्या ब्रिटिशकालीन मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीसाठी तज्ज्ञ मंडळी जलाशयाची अंतर्गत पाहणी करणार आहेत. मलबार हिल जलाशयातील कप्पा क्रमांक १ ची अंतर्गत पाहणी करण्यात येणार असून या जलाशयाचा कप्पा क्रमांक १ पूर्णपणे रिक्त करण्यात येणार आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईतील महापालिकेच्या ‘ए’, ‘सी’, ‘डी’ आणि ‘जी दक्षिण’ विभाग कार्यालयांच्या हद्दीतील काही भागात १८ डिसेंबर रोजी १० टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई ठाण्यात पाणी कपात होणार आहे. तर ठाण्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेअंतर्गत बारवी जलशुद्धीकरण केंद्र जांभूळमध्ये तातडीचे दुरूस्तीचं काम करण्यात येत आहे. त्यामुळे आज (शुक्रवार) दुपारी 12 पासून रात्री 12 पर्यंत एकूण 12 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे मुंबईकर आणि ठाणेकर नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलं आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेकडून हे आवाहन करण्यात आलं आहे.

Published on: Dec 15, 2023 12:25 PM