Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Weather Update : मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार, IMD चा अंदाज काय?

Mumbai Weather Update : मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर ‘या’ महिन्यात धुव्वाधार बरसणार, IMD चा अंदाज काय?

| Updated on: Mar 26, 2025 | 5:06 PM

होळीनंतर राज्यात उन्हाचा कडाका वाढताना दिसत आहे. अशातच दोन दिवसांपासून राज्यातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसाने कहर केला असताना हवामान खात्याकडून नवा अंदाज वर्तवला जात आहे. येत्या शनिवारपासून मुंबईत उकाडा वाढणार असून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा अंदाज आहे.

मुंबईतील हवामानात पुन्हा एकदा बदल होऊ लागला आहे. दरम्यान, येत्या शनिवारपासून मुंबईत तापमान वाढण्याची शक्यता असून उकाडा वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. तर एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात पावसाचा अंदाज देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. IMD अर्थात भारतीय हवामान खात्याकडून शेवटच्या आठवड्यापासूनच कमाल तापमान 36 अंशापर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सध्या मुंबईमध्ये 33 अंश सेल्सिअस असं तापमान आहे. भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, येत्या शनिवारपासून तापमान वाढणार असून 31 मार्चपर्यंत हे तापमान 35 अंश सेल्सिअसपर्यंत घसरेल. यादरम्यान आकाश निरभ्र असणार आहे. यासोबतच एप्रिल महिन्यातील पहिल्याच आठवड्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून या महिन्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

Published on: Mar 26, 2025 05:06 PM