Mumbai Weather : मुंबईकरांनो काळजी घ्या, कारण उद्यापासून दोन दिवस… हवामान खात्यानं काय म्हटलं?
संपूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती पाहिली तर गेल्या दोन दिवसांपासून कोकणपट्ट्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावण्यात आल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं.
मुंबईकरांनो तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबईत सर्वत्र दमट वातावरण असून उद्यापासून मुंबईत उन्हाचा कडाका वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. भारतीय हवामान विभागाकडून गेल्या दोन दिवसापूर्वी मुंबईत अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. हवामान विभागाकडून वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईतील दादर, वरळी आणि परेळ भागात पावसाची रिमझिम पाहायला मिळाली. मात्र आज सकाळपासून मुंबईचं वातावरण काहीसं बदलल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईचं वातावरण काहिसं दमट आणि ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. मुंबईतील कालच्या हवामानाचा विचार केला असता कुलाबा हवामान वेध शाळेच्या अंदाजानुसार, ३३.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर सांताक्रूझ वेध शाळेच्या अंदाजानुसार, ३४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान आज मुंबईत संपूर्ण ढगाळ वातावरण असलं तरी उद्यापासून दोन दिवस मुंबईतील तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज आहे.

मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन

..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा

भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल

नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले
