Mumbai | मुंबईकरांना मिळणार फिरत्या लसीकरणाची सुविधा
मुंबईतील लसीकरणाचा वेग गेल्या काही दिवसांपासून मंदावलेला असल्यामुळे लसीकरणाला गती देण्यासाठी पालिकेची यंत्रणा आता सोसायटय़ा आणि झोपडपट्टय़ांमध्ये पोहोचणार आहे.
आता फिरत्या केंद्रांद्वारे लसीकरण ; वेग वाढवण्यासाठी महापालिका सोसायटय़ांच्या दारी! दोन मात्रा घेतलेल्यांसाठी सर्व निर्बंध शिथिल केल्यानंतर नागरिकांचा लसीकरणाकडे ओघ वाढला होता. मुंबईतील लसीकरणाचा वेग गेल्या काही दिवसांपासून मंदावलेला असल्यामुळे लसीकरणाला गती देण्यासाठी पालिकेची यंत्रणा आता सोसायटय़ा आणि झोपडपट्टय़ांमध्ये पोहोचणार आहे. रुग्णवाहिका आणि फिरत्या लसीकरण केंद्रांद्वारे नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. दोन मात्रा घेतलेल्यांसाठी सर्व निर्बंध शिथिल केल्यानंतर नागरिकांचा लसीकरणाकडे ओघ वाढला होता. मात्र आता पुन्हा एकदा लसीकरण केंद्रांवरील गर्दी ओसरू लागली आहे. लसीकरण १०० टक्के झालेले नाही. लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी पालिका आता स्वत:च लोकांपर्यंत पोहोचणार आहे.
Latest Videos