Aslam Shaikh | न्यू ईयर सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस सज्ज : अस्लम शेख
मुंबईच्या वेशीवर रात्रीपासूनच मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला असून, मुलुंड टोलनाक्यावर पोलीस मुंबईत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करत आहेत. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेकजण मुंंबईमध्ये येत असतात. मात्र गेल्या दोन वर्षांपासून नववर्षाच्या सेलिब्रेशनवर कोरोनाचे सावट आहे.
मुंबई : मुंबईमध्ये दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनने देखील शहरात शिरकाव केला आहे. ओमिक्रॉनच्या प्रसाराचा वेग अधिक असल्याने मुंबई महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. नववर्षाच्या स्वागत पार्ट्यांना प्रतिबंध घालण्यात आला असून, नागरिकांना गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मुंबईच्या वेशीवर रात्रीपासूनच मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला असून, मुलुंड टोलनाक्यावर पोलीस मुंबईत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करत आहेत. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेकजण मुंंबईमध्ये येत असतात. मात्र गेल्या दोन वर्षांपासून नववर्षाच्या सेलिब्रेशनवर कोरोनाचे सावट आहे. यंदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये काही प्रमाणात घट झाली होती. त्यामुळे कोरोना संकट टळल्याचे बोलले जात होते. कोरोनाचे रुग्ण कमी होत असतानाच आता पुन्हा एकदा ओमिक्रॉनने डोकेवर काढले आहे. ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नववर्षाच्या स्वागत पार्ट्यांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच नववर्षाचे स्वागत घरी राहूनच करावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून, प्रत्येक वाहनांची तपासणी सुरू आहे.