मुंबईच्या पावसाने तीन वर्षाचा मोडला विक्रम; 24 तासात 1 हजार 512.6 मिमी पाऊस
कालपासून मुंबईमध्ये मुसळधार पावसाने सुरुवात केली आहे. हवामान विभागाने गुरुवारी मुंबईसाठी रेड अलर्ट दिला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे सखल भागात पाणी साचू लागलं आहे.
मुंबई, 27 जुलै 2023 | कालपासून मुंबई मध्ये मुसळधार पावसाने सुरुवात केली आहे. हवामान विभागाने गुरुवारी मुंबईसाठी रेड अलर्ट दिला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे सखल भागात पाणी साचू लागलं आहे. आज दुपारपर्यंत मुंबईत अतिमुसळधारेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचा परिणाम मध्य रेल्वेवर झाला आहे. मात्र, पश्चिम आणि हर्बल मार्गावरील रेल्वेसेवा सुरळीत असल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे. दरम्यान यंदा जुलै महिन्यात पडलेल्या पावसाने तीन वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडला आहे. जुलै 2020 साली पावसाची नोंद 1 हजार 502.6 मिमी होती. ती यंदा 1 हजार 512.6 मिमी एवढी झाली आहे. बुधवारी मुंबईत 124 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन मुंबई पालिका आयुक्तांनी केलं आहे.
Published on: Jul 27, 2023 10:24 AM
Latest Videos