मुंब्र्यातील धर्मांतर प्रकरणावरून आव्हाड याच्यांवर कोणाची टीका? म्हणाला, ‘ त्यांना काडीचीही…’
राष्ट्रवादी काँग्रेस नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गेममध्ये मधून कधी धर्मांतर होऊ शकत का असा सवाल केला होता. तर मुंब्र्यातील तरुणांचं भवितव्य धोक्यात असून 400 जणांचं धर्मांतर झालंय, त्या मुलांची नावं द्या, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांकडे केली होती.
मुंबई : मोबाईल गेम धर्मांतर प्रकरण मुंब्र्यात उघडकीस आलं त्यानंतर पोलिसांनी आरोपी शाहनवाझ मकसूदला अटक केली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गेममध्ये मधून कधी धर्मांतर होऊ शकत का असा सवाल केला होता. तर मुंब्र्यातील तरुणांचं भवितव्य धोक्यात असून 400 जणांचं धर्मांतर झालंय, त्या मुलांची नावं द्या, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांकडे केली होती. त्यावनरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी आव्हाड यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी, आव्हाड यांनी, औरंगजेब हा धर्म वेडा नव्हता तो मानवतावादी होता असं म्हटलं होतं. त्याचं केवळ आणि केवळ गाजा पट्टीत काय होतंय पॅलेस्टाईनच्या लोकांना काय पाहिजे यावर लक्ष असतं. त्यामुळं आव्हाडांच्या म्हणण्याला काडिचीही किंमत नाही. तर अशा प्रकारची धर्मांतर करण्यामध्ये आव्हाड यांची फूस आहे का अशी स्थिती आज आहे असं भातखळकर यांनी म्हटलं आहे.