Mumbra Crime News : मुंब्रा अत्याचार आणि हत्या प्रकरण; पीडितेच्या भावाचे आरोपीवर गंभीर आरोप
Mumbra Girl Abuse case : मुंब्रा येथे झालेल्या 10 वर्षीय चिमुकलीवरील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी हा इतर आरोपींची नावं लपवत आहेत, असा आरोप पीडितेच्या भावाने केला आहे.
मुंब्रा येथे झालेल्या 10 वर्षीय चिमुकलीवरील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी हा इतर आरोपींची नावं लपवत आहेत, असा आरोप पीडितेच्या भावाने केला आहे. टीव्ही 9 मराठीच्या प्रतिनिधीसोबत साधलेल्या संवादात त्याने हा आरोप केला आहे. बहीण खेळत असताना तिला उचलून नेलं आणि मग अत्याचार केला असंही पीडितेच्या भावाने सांगितलं आहे.
यावेळी बोलताना पीडितेच्या भावाने सांगितलं की, ‘माझी बहीण शाळेतून आल्यावर बिल्डिंगच्या खाली इतर मुलींसोबत आंधळी कोशिंबीर खेळत होती. त्यावेळी आरोपी त्या ठिकाणी आला. तिच्या डोळ्याला खेळताना पट्टी बांधलेली होती. त्याने तसंच तीच तोंड बंद करून तिला उचलून नेलं. त्यानंतर घटना घडली त्या ठिकाणी तिला आरोपी घेऊन गेला व तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिचा गळ्यावर धारधार शस्त्राने वार करून तिची हत्या केली आणि खिडकीतून खाली फेकून दिल्याचा तपशील यावेळी पीडितेच्या भावाने सांगितला.
दरम्यान, आरोपी एकटा नव्हता, त्याच्यासोबत त्याचे साथीदार होते, मात्र आरोपी त्यांची नावं सांगत नाही आहे, असा आरोप देखील यावेळी बोलताना पीडितेच्या भावाने केला आहे.

भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्...

पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून...

गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने

इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी
