किशोर आवारे हत्याप्रकरणात राष्ट्रवादीच्या ‘त्या’ आमदाराचा डाव? हत्येचा कट रचल्याचा खळबळजनक आरोप 

किशोर आवारे हत्याप्रकरणात राष्ट्रवादीच्या ‘त्या’ आमदाराचा डाव? हत्येचा कट रचल्याचा खळबळजनक आरोप 

| Updated on: May 13, 2023 | 8:34 AM

VIDEO | किशोर आवारे यांच्या आईने राष्ट्रवादीच्या 'त्या' आमदाराचं नाव घेत हत्येप्रकरणी आरोप केल्याने उडाली खळबळ

पुणे : पुणे शहरात काल भरदिवसा सामाजिक कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला झाला. आधी पिस्तूलने गोळ्या झाडल्या. त्यानंतर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले आहे. या प्रकारानंतर पुणे शहरात खळबळ माजली उडाली. हल्ला झाल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरु केला आहे. पिंपरी चिंचवड येथील जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. नगरपरिषद कार्यालासमोरच ही धक्कादायक घटना घडलेली आहे. कार्यालयातून बाहेर येताच, दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी आवारे यांच्यावर हल्ला केला. तर तळेगावात अज्ञात हल्लेखोरांनी आवारे यांच्यावर आधी गोळ्या झाडल्या त्यानंतर धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर वार करून फरार झाले. या हत्येच्या निषेधार्थ तळेगाव परिसरात व्यापाऱ्यांनी उत्सफुर्त बंद पुकारल्याचेही पाहायला मिळाले. अशातच किशोर आवारे यांच्या आईने थेट राष्ट्रवादीच्या आमदारावरच हत्येप्रकरणी आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. या हत्येचा कट मावळमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळकेंनी रचल्याचा आरोप आवारे यांच्या आईने केला आहे. एफआयआरमध्ये आमदार सुनील शेळके, त्यांचे भाऊ सुधाकर शेळके, संदीप गराडे, श्याम निगडकरसह अन्य तीन अनोळखी इसमांचा उल्लेख आहे.

Published on: May 13, 2023 08:32 AM