VIDEO : Murlidhar Mohol | राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षांनी बनवेगिरी थांबवावी, मुरलीधर मोहोळांचा हल्लाबोल

VIDEO : Murlidhar Mohol | राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षांनी बनवेगिरी थांबवावी, मुरलीधर मोहोळांचा हल्लाबोल

| Updated on: Jun 30, 2021 | 2:11 PM

उपमुख्यमंत्री कार्यालयात पुण्यातील प्रश्नांबाबत आयोजित बैठकीला गैरहजेरीवरुन पुण्याचे महापौर, भाजप नेते मुरलीधर मोहोळ (Pune Mayor Murlidhar Mohol) आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांच्यात कलगीतुरा रंगला आहे.

उपमुख्यमंत्री कार्यालयात पुण्यातील प्रश्नांबाबत आयोजित बैठकीला गैरहजेरीवरुन पुण्याचे महापौर, भाजप नेते मुरलीधर मोहोळ (Pune Mayor Murlidhar Mohol) आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. “राष्ट्रवादीच्या उथळ शहराध्यक्षांनी खोटं बोलून पुणेकरांची करत असलेली दिशाभूल थांबवावी” असं जोरदार प्रत्युत्तर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटरवरुन दिलं आहे.

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी बुधवारी सकाळी एकामागून एक 12 ट्विट करत आपल्यावरील आरोप खोडून काढले आहेत. “राष्ट्रवादीच्या उथळ शहराध्यक्षांनी खोटं बोलून पुणेकरांची करत असलेली दिशाभूल थांबवावी ! राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रसिद्धीसाठी इतके पिपासू झाले आहेत, की गेल्या चार वर्षातील ‘अडगळी’चा बॅकलॉग त्यांना लगेचच भरून काढायचा आहे.