राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीवर एकनाथ शिंदे काय म्हणाले?

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीवर एकनाथ शिंदे काय म्हणाले?

| Updated on: Mar 04, 2022 | 5:16 PM

आम्ही मंत्री, उपमुख्यमंत्री आणि नाना पटोले यांच्यासह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटलो. आमची सकारात्मक चर्चा झाली आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

आम्ही मंत्री, उपमुख्यमंत्री आणि नाना पटोले यांच्यासह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटलो. आमची सकारात्मक चर्चा झाली आहे. आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. बारा आमदार आहेत. लोकशाहीत सरकारचं महत्त्व असतं. बहुमताच्या सरकारनं घेतलेल्या निर्णयाचं महत्त्व असतं. आम्ही त्यांना 12 आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केलीय. ते सकारात्मक असल्याचं म्हणाले. आता काय होतं. हे पाहू, असं एकनाथ शिंदे म्हणाले,