आले होते जरांगेंना समजवायला, स्वत:च मोर्चात सामील होणार; सरकारमधील नेत्यानंच घेतला मोठा निर्णय

आले होते जरांगेंना समजवायला, स्वत:च मोर्चात सामील होणार; सरकारमधील नेत्यानंच घेतला मोठा निर्णय

| Updated on: Jan 20, 2024 | 5:05 PM

मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या पूर्ण न झाल्याने मनोज जरांगे पाटील आता थेट मुंबईत धडकणार आहे. वेळोवेळी सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली पण त्यांची ही चर्चा निष्फळ ठरल्याचे पाहायला मिळाले. आता या सरकारमधील नेत्यानंच मोठा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.

अमरावती, २० जानेवारी २०२४ : हजारो मराठ्यांसह मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी या गावातून मुंबईकडे रवाना झाले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या पूर्ण न झाल्याने मनोज जरांगे पाटील आता थेट मुंबईत धडकणार आहे. वेळोवेळी सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली पण त्यांची ही चर्चा निष्फळ ठरल्याचे पाहायला मिळाले. आता या सरकारमधील नेत्यानंच मोठा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. आता सरकार म्हणून भूमिका संपली असून एक आंदोलक म्हणून जरांगे पाटील यांच्या मोर्च्यात सहभागी होणार असल्याचे प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी म्हटले आहे. तर जरांगे पाटलांनी सांगितल्यानुसार सगे-सोयरे या शब्दाच्या दुरूस्त्या केल्या. सरकारने या दुरूस्तीवर सकारात्मक होत सगे सोयरे याचा प्रश्न मिटला असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले त्यामुळे सरकार निर्दयी झाले, असे म्हणता येणार नाही, असे स्पष्टपणे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

Published on: Jan 20, 2024 05:05 PM