महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, असं नेमकं काय घडतंय? ज्याची गावकऱ्यांमध्ये धडकी

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, असं नेमकं काय घडतंय? ज्याची गावकऱ्यांमध्ये धडकी

| Updated on: Jan 08, 2025 | 10:09 PM

डोक्याचे केस गळत असल्याने शेगांव तालुक्यातील बोंड गावातील नागरिक भयभीत झाले असून तीनच दिवसात टक्कल पडत आहे. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले असून लहान मुलांसह महिला आणि वृद्धांचे सुद्धा डोक्याचे केस गळत आहेत.

बुलढाणा जिल्ह्यातील शेगावच्या अनेक गावांत सध्या टक्कल व्हायरसचा धुमाकूळ सुरू आहे. येथे या अज्ञात व्हायरसमुळे अनेक लोकांना केस गमवावे लागत आहेत. आधी डोक्याला खाज सुटते, नंतर केस गळून सरळ हातात येतात आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडते, यामुळेच नागिरक घाबरले आहेत. डोक्याचे केस गळत असल्याने शेगांव तालुक्यातील बोंड गावातील नागरिक भयभीत झाले असून तीनच दिवसात टक्कल पडत आहे. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले असून लहान मुलांसह महिला आणि वृद्धांचे सुद्धा डोक्याचे केस गळत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील केस गळतीच्या प्रकाराने आरोग्य विभागाच्या टीमचे डोके देखील चक्राऊन सोडले आहे. अचानक नागरिकांचे डोक्यावरील केस गळायला सुरुवात झाल्याने अनेकांना टक्कल पडले आहे. या संपूर्ण प्रकाराची वाच्यता झाल्यानंतर आरोग्य विभागाची मोठी टीम या गावात दाखल झाली आहे. मात्र संपूर्ण रुग्णांची तपासणी केल्यानंतर या आरोग्य विभागाच्या टीममध्ये आलेल्या डॉक्टरांचे डोके चक्रावून गेले आहे. डोक्यात वाढलेल्या विविध समस्यांमुळे ही केस गळती लागली असल्याचा अंदाज डॉक्टरांकडून वर्तवला जाऊ लागलाय, मात्र केस गळतीचे नेमके कारण डॉक्टरांनाही समजले नाही. त्यामुळे आता येथील नागरिकांच्या त्वचा आणि केसांचे नमुने घेण्यात आले असून या नमुन्यांची तपासणी झाल्यानंतरच या केस गळतीच्या आजाराचे नेमके कारण लक्षात येईल असं डॉक्टरांकडून सांगण्यात आलंय. आतापर्यंत ५० ते ५५ रुग्ण आढळले

Published on: Jan 08, 2025 10:09 PM