Nagpur | नागपुरात तिसऱ्या लाटेची तयारी, प्राथमिक आरोग्य केंद्रांना मिळाल्या 10 रुग्णवाहिका
पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते या 10 रुग्णवाहिकांचं लोकार्पण करण्यात आलं. नागपूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी 56 रुग्णवाहिका कार्यरत आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नागपूर जिल्हयात हाहाःकार उडाला होता. रुग्णांना नेण्यासाठी वेळेवर रुग्णवाहिका मिळत नव्हती, त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तयारी आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण आरोग्य सेवा सक्षम करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी दहा नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या.
प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी 10 रुग्णवाहिका
पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते या 10 रुग्णवाहिकांचं लोकार्पण करण्यात आलं. नागपूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी 56 रुग्णवाहिका कार्यरत आहेत. त्यात आणखी दहा रुग्णवाहिकेची भर पडलीय. नवीन रुग्णवाहिका जिल्हा विकास निधी तसेच खनिज विकास निधी अंतर्गत देण्यात आल्या.
Published on: Aug 08, 2021 11:31 AM
Latest Videos