नागपुरात नाल्यात गेलेल्या मगरीला शोधण्यासाठी कॅमेरा ट्रॅप, वन विभागाकडून खबरदारीचं आवाहन
नागपूरात नाल्यात गेलेल्या मगरीला शोधण्यासाठी कॅमेरा ट्रॅप करण्यात आला होता. महाराजबागेजवळील पत्रकार वसाहतीच्या मागे नाल्यात गेल्या मगरीचे वास्तव्य होते. नाल्यातील मगरींच्या वास्तव्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले होते.
नागपूर : नागपूरात नाल्यात गेलेल्या मगरीला शोधण्यासाठी कॅमेरा ट्रॅप करण्यात आला होता. महाराजबागेजवळील पत्रकार वसाहतीच्या मागे नाल्यात गेल्या मगरीचे वास्तव्य होते. नाल्यातील मगरींच्या वास्तव्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले होते. याच पार्श्वभूमीवर मगरीच्या शोधासाठी वनखात्याने आता याठिकाणी कॅमेरा ट्रॅप बसवले. वन विभागाने नागरीकांना खबरदारीच्या उपाययोजना, दक्षता आणि काळजी घेण्याचं आवाहन केले आहे. तसेच या विभागात मगराची हालचाल दिसल्यास ०७१२-२५१५३०६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आले आहे.
Latest Videos