Nagpur Congress Update | नागपुरात महागाईच्या विरोधात कॉंग्रेसची भर पावसात सायकल यात्रा
नाना पटोले यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारविरोधात हे आंदोलन करण्यात आलं. मुसळाधार पावसात भिजत नाना पटोले, कॅबिनेट मंत्री सुनील केदार या सायकल यात्रेत सहभागी झाले.
महागाईच्या विरोधात आज नागपुरात काँग्रेसने सायकल यात्रा काढली. भर पावसात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारविरोधात हे आंदोलन करण्यात आलं. मुसळाधार पावसात भिजत नाना पटोले, कॅबिनेट मंत्री सुनील केदार या सायकल यात्रेत सहभागी झाले. यावेळी काँग्रेस आ. विकास ठाकरे, आ. अभिजीत वंजारी, प्रवक्ते अतुल लोढे, यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते या सायकल यात्रेत सहभागी झाले. पेट्रोल, डिझेल, गॅस, डाळी, खाद्यतेलाच्या महागाई विरोधात आंदोलन करण्यात आलंय.
Published on: Jul 08, 2021 03:44 PM
Latest Videos