Nagpur | नागपुरात आजपासून नवीन निर्बंध लागू, सीताबर्डी मार्केटमध्ये पहाटेपासून लगबग
नागपूरात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. नागपूरात गेल्या 24 तासांत शहरात फक्त 22 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झालीये.
नागपुरात मागील काही दिवसांत कोरोनाबळींची संख्या कमी झाल्याने नागपुरकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे नागपुरात आजपासून (28 जून) नवे निर्बंध लागू करण्यात आले आहे. दरम्यान नव्या निर्बंधानंतर नागपुरच्या प्रसिद्ध सीताबर्डी मार्केटमध्ये पहाटेपासूनच नागरिकांनी खरेदीसाठी लगबग सुरु केली आहे.
नागपूरात कोरोना रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. गेल्या 24 तासांत शहरात फक्त 22 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झालीये. तर दिवसभरात 69 जणांनी केली कोरोनावर मात केलीये. त्यासोबतच कोरोना मुक्त होण्याचा दर 98.2 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर नागपुरातील कोरोनाची सक्रिय रुग्ण संख्याही 426 वर आली आहे.
Latest Videos