Nagpur Lockdown | नागपूर पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर? नितीन राऊतांचं मोठं वक्तव्य

| Updated on: Sep 06, 2021 | 7:21 PM

नितीन राऊत यांनी आज विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात एका बैठकीचं आयोजन केलं होतं. यावेळी राऊत यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन अधिकारी आणि डॉक्टरांना सूचनाही केल्या.

नागपूर: गेल्या काही दिवसांपासून नागपूरमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातच जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. येत्या तीन ते चार दिवसात नागपूरमध्ये लॉकडाऊन लावण्याचं सूतोवाच नितीन राऊत यांनी केलं आहे. त्यामुळे नागपूरला पुन्हा एकदा लॉकडाऊनमध्ये जावं लागणार असल्याचं दिसून येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या एक आकडी संख्येत होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ही संख्या डबल अंकी झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर नितीन राऊत यांनी आज विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात एका बैठकीचं आयोजन केलं होतं. यावेळी राऊत यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन अधिकारी आणि डॉक्टरांना सूचनाही केल्या. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधतान लॉकडाऊन लावण्याचे सूतोवाच केलं.