Nagpur Election | विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसमध्ये आलो नव्हतो : छोटू भोयर

Nagpur Election | विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसमध्ये आलो नव्हतो : छोटू भोयर

| Updated on: Dec 09, 2021 | 11:54 PM

छोटू भोयर यांनी निवडणूक लढवण्यास असमर्थता दाखवल्याचं सांगत काँग्रेसनं अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला आहे. दरम्यान, आपण निवडणूक लढवण्यास असमर्थता दर्शवली नसल्याचं भोयर यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलंय. तसंच देशमुख यांना निवडून आणण्यासाठी काम करणार असल्याचा दावाही त्यांनी केलाय.

विधान परिषद निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असताना नागपुरात काँग्रेसच्या गोटात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. काँग्रेसवर आपला उमेदवार बदलण्याची नामुष्की ओढावली आहे. छोटू भोयर यांनी निवडणूक लढवण्यास असमर्थता दाखवल्याचं सांगत काँग्रेसनं अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला आहे. दरम्यान, आपण निवडणूक लढवण्यास असमर्थता दर्शवली नसल्याचं भोयर यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलंय. तसंच देशमुख यांना निवडून आणण्यासाठी काम करणार असल्याचा दावाही त्यांनी केलाय.

निवडणूक लढवण्यासाठी मी असमर्थता दर्शवली नाही. काँग्रेसकडून काढण्यात आलेल्या पक्षकार मात्र मी असमर्थता दर्शवली असल्याचं म्हटलंय. पण जर काँग्रेसला वाटत असेल की ही निवडणूक छोटू भोयर यांच्या नावावर जिंकू शकत नाही. त्यामुळे जर त्यांनी उमेदवार बदलला असेल तर मी त्या निर्णयाचा स्वीकार करतो. मंगेश देशमुख यांच्या विजयासाठी मी जे जे करु शकतो ते या 12 तासात करेन. मात्र, पक्षानं असं का केलं याबाबत प्रदेशाध्यक्षांशी बोलूनच सांगेन, असं छोटू भोयर म्हणाले.