नागपूर सजलं! चिमुकला भाविक बाप्पाला डोक्यावर घेऊन जाताना...

नागपूर सजलं! चिमुकला भाविक बाप्पाला डोक्यावर घेऊन जाताना…

| Updated on: Aug 30, 2022 | 1:15 PM

नागपुरात चितारओळीमधून सकाळपासून ढोलताशांच्या निनादात शहरातील आणि शहराच्या बाहेर गणपतींची मूर्ती नेली जात असल्यामुळे या भागात लोकांची गर्दी वाढली आहे.

नागपूर: ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष करीत उद्या, बाप्पांच्या आवडत्या दिवशी म्हणजेच बुधवारी घरोघरी आणि शहरातील विविध भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणपतीची प्रतिष्ठापना (Ganpati Pratisthapna) होणार आहे. गणेशोत्सवामुळे शहरात उत्साहाचे वातावरण आहे. गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav) निमित्ताने शहरातील विविध सार्वजनिक मंडळात देखावे निर्माण केले जात असून त्यावर अंतिम हात फिरविला जात आहे. तसेच घरोघरी गणपतींच्या आगमनाची तयारी केली जात आहे. नागपुरात चितारओळीमधून सकाळपासून ढोलताशांच्या निनादात शहरातील आणि शहराच्या बाहेर गणपतींची मूर्ती नेली जात असल्यामुळे या भागात लोकांची गर्दी वाढली आहे. चितारओळीमधून हा चिमुकला गणपती बाप्पाला (Ganpati Bappa 2022) घरी घेऊन जातोय. बघुयात चितारओळी मधील ही खास दृश्य…

 

 

Published on: Aug 30, 2022 01:00 PM