Nagpur | नागपुरात दोन मैत्रिणी बांधणार लगीनगाठ, साक्षगंध केलेल्या ‘त्या’ मुली TV9 वर
सुरभी आणि पारोमिता या दोघींचे कुटुंबीय समंजस आणि उच्चशिक्षित असल्यानं त्यांनी या नात्याचा अखेर स्वीकार केला. दोन्ही कुटुंबीयांनी नागपूरमध्ये साक्षगंध करण्याचा निर्णय घेतला. काही मोजके नातेवाईक, एलजीबीटी (लेस्बियन, गे, बायो, ट्रान्सजेंडर) समूहातील सदस्य अशा दीडशे लोकांच्या उपस्थितीमध्ये हा अनोखा सोहळा पार पडला.
नागपूर येथील डॉ. सुरभी मित्रा आणि कलकत्ता येथील पारोमिता या उच्चशिक्षित असून त्यांची नागपूर येथील एका परिषदेत भेट झाली. सुरभी डॉक्टर आहे. तर, पारोमिता एका कॉर्पेरिट कंपनीमध्ये असून ती दिल्ली येथे नोकरी करते. प्रथम भेटीमध्ये ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. वर्षभर मैत्री निभावल्यानंतर आपल्यात एक अनोखे नाते असल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. प्रेमविवाह म्हटलं की अनेक स्तरावर आजही विरोध होतो, अशात लेसबीयन तरुणींच्या या अनोख्या नात्याला विरोध नसता झालातर नवलच. मात्र, सुरभी आणि पारोमिता या दोघींचे कुटुंबीय समंजस आणि उच्चशिक्षित असल्यानं त्यांनी या नात्याचा अखेर स्वीकार केला. दोन्ही कुटुंबीयांनी नागपूरमध्ये साक्षगंध करण्याचा निर्णय घेतला. काही मोजके नातेवाईक, एलजीबीटी (लेस्बियन, गे, बायो, ट्रान्सजेंडर) समूहातील सदस्य अशा दीडशे लोकांच्या उपस्थितीमध्ये हा अनोखा सोहळा पार पडला.