Nagpur Weather | नागपुरात पावसाची पुन्हा संततधार, हवामान खात्यानं कोणता दिला अलर्ट?
VIDEO | नागपुरमध्ये रिमझिम पडणारा पाऊस अचानक मुसळधार कोसळण्यास सुरूवात, हवामान विभागाने नागपुरमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला असून हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
नागपूर, १५ सप्टेंबर २०२३ | गेल्या काही दिवस पावसानं विश्रांती घेतल्यानंतर राज्यात पुन्हा पावसाने बरसण्यास सुरूवात केली आहे. नागपुरमध्ये रिमझिम पडणारा पाऊस अचानक मुसळधार कोसळण्यास सुरूवात झाली आहे. सकाळपासून रिमझिम पडणाऱ्या पावसाचा जोर अचानक वाढल्याचे दिसून आले आहे. पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने नागपुरकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. दरम्यान, हवामान विभागाने नागपुरमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला असून हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला हा यलो अलर्ट शेतीसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. तर आता पडणारा पाऊस हा शेतीसाठी उपयुक्त ठरणारा पाऊस असणार असल्याचेही हवामान विभागाने सांगितले आहे. गेल्या काही दिवसांपासून नागपुरात उकाडा हा चांगलाच वाढला आहे. त्यामुळे पुन्हा पाऊस कोसळल्याने नागपुरकरांना दिलासा मिळाला आहे.