वज्रमुठवरील फडणवीसांच्या टीकेला आदित्य ठाकरेंच प्रत्युत्तर, म्हणाले...

वज्रमुठवरील फडणवीसांच्या टीकेला आदित्य ठाकरेंच प्रत्युत्तर, म्हणाले…

| Updated on: Apr 14, 2023 | 10:45 AM

मविआच्या वज्रमुठ छायाचित्र बघितले असून त्याला भेगा पडलेल्या आहेत. ही भेगा पडलेली वज्रमुठ आमचा मुकाबला करू शकत नाही असे फडणवीस यांनी म्हटलं होतं

मुंबई : नागपूर येथे महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा 16 एप्रिल रोजी होणार आहे. त्यावर भाजपकडून विरोध होत आहे. यादरम्यान भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मविआला वज्रमुठ छायाचित्रावरून छेडत टीका केली. त्यांनी मविआच्या वज्रमुठ छायाचित्र बघितले असून त्याला भेगा पडलेल्या आहेत. ही भेगा पडलेली वज्रमुठ आमचा मुकाबला करू शकत नाही असे म्हटलं होतं. त्यावर उद्धव ठाकरे गटाचे नेते माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच कुठेही वज्रमूठीला भेगा पडलेल्या नाहीत. त्यांच्याकडे लक्ष देऊ नका संविधान आणि लोकशाही टिकली पाहिजे त्याच्यासाठी आम्ही लढत आहोत असे म्हटलं आहे.

Published on: Apr 14, 2023 10:45 AM