Nagpur Election | ट्रिपला गेलेले भाजप नगरसेवक मतदानाच्या दिवशी नागपुरात दाखल

Nagpur Election | ट्रिपला गेलेले भाजप नगरसेवक मतदानाच्या दिवशी नागपुरात दाखल

| Updated on: Dec 10, 2021 | 12:39 PM

भाजपकडे संख्याबळ अधिक आहे. त्यामुळं भाजपचं पारडं या निवडणुकीत जड आहे. निवडणुकीपूर्वी सहलीला गेलेले भाजप नगरसेवक मतदानाच्या दिवशी नागपूरमध्ये दाखल झाले आहेत.

नागपूर विधान परिषद निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झालीय. 15 केंद्रांवर मतदान पार पडते आहे. प्रत्यक्ष मतदानाला काही तास शिल्लक असताना काँग्रेसनं आपला अधिकृत उमेदवार बदलवून अपक्ष उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळं आता भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे विरूद्ध काँग्रेस समर्थीत अपक्ष उमेदवार यांच्यात लढत होत आहे. मात्र, भाजपकडे संख्याबळ अधिक आहे. त्यामुळं भाजपचं पारडं या निवडणुकीत जड आहे. निवडणुकीपूर्वी सहलीला गेलेले भाजप नगरसेवक मतदानाच्या दिवशी नागपूरमध्ये दाखल झाले आहेत.