ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, असं अद्भूत दृश्य तुम्ही कधी बघितलंय?
ताडोबातील ‘नयनतारा’ वाघीण आणि ‘डेडली बॉईज’ या जोडप्याने तलावा शेजारी फेरफटका मारल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. नवेगाव निमढेला सफारी क्षेत्रातल्या नैसर्गिक पाणवठ्याच्या काठावर ‘नयनतारा’ आणि ‘डेडली बॅाईज’ निवांत फिरताना दिसताय. असं अद्भूत दृश्य तुम्ही कधी बघितलंय?
गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या कडाक्याने मनुष्याच्या अंगाची लाहीलाही होत आहे. अशातच राज्यातील काही जिल्ह्यात उन्हाचे तापमान अधिक असल्याने उष्माघाताने कित्येकांचे बळीही गेले आहेत. मनुष्याचे हे हाल आहेत तर मग मुक्या जीवांचं काय? सध्या सुट्ट्यांचा हंगाम आहे. पर्यटनप्रेमी, पर्यटक ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटनास जाताना दिसताय. अशातच उन्हाळा सुरू असल्याने ताडोबा येथे वाघ आपली तहान भागवायला किंवा थंडावा जाणवावा म्हणून पाणवठ्यावर फिरकता दिसताय. ताडोबातील ‘नयनतारा’ वाघीण आणि ‘डेडली बॉईज’ या जोडप्याने तलावा शेजारी फेरफटका मारल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. नवेगाव निमढेला सफारी क्षेत्रातल्या नैसर्गिक पाणवठ्याच्या काठावर ‘नयनतारा’ आणि ‘डेडली बॅाईज’ निवांत फिरताना दिसताय. पाणी स्वच्छ असल्याने वाघांचे प्रतिबिंब तलावात अगदी स्पष्ट दिसून येतेय. वन्यजीव अभ्यासक कांचन पेठकर आणि डेक्कन ड्रीफ्टसचे प्रमुख पीयूष आकरे यांनी हा क्षण कॅमेऱ्यात टीपला आहे. उन्हाळ्यामुळे या वाघांचं कपल बहुतेक वेळा तलावाजवळच राहत असल्याने जंगलात सफारीसाठी येणाऱ्या पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र बनले आहे.