Nagpur flood | नागपुरात मुसळधार पावसाचं थैमान, नाग नदीवरील पूल कोसळला अन्…
VIDEO | नागपुरात शुक्रवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने नागपुरकरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे नाग नदीला पूर आला तर नाग नदीवरील पूल खचला अन् वाहतूक देखील ठप्प.
नागपूर, २३ सप्टेंबर २०२३ | नागपुरात शुक्रवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने नागपुरकरांचे जनजीवन विस्कळीत केले आहे. नागपुरातील पंचशील चौक ते झाशी राणी चौकात नाग नदीवरील पूल कोसळल्याची घटनादेखील या मुसळधार पावसाने घडली आहे. नागपुरातील नाग नदीला पूर आल्याने तसेच नाग नदीवरील पूल कोसळल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. या पूलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. तर हा रहदारीचा रस्ता असल्याने आता वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. नागपूर शहरात काल सुरू झालेला पाऊस हा सकाळी साडेपाच वाजेपर्यंत १०६. ७ मिमी इतका झाल्याची नोंद हवामान विभागाकडून करण्यात आली आहे. तर मोरभवन येथे असलेले बस स्थानक चार ते पाच फुटांपर्यंत पाण्याखाली गेले आहे. तर गांधी नगर येथील शासकीय मुलींच्या वसतीगृहातही पाणी शिरलं आहे. मनपाच्या अग्निशमन विभागाने ५० मुलींचं रेस्क्यू ॲापरेशन केलं असून मुलींना रेस्क्यू करुन इतर ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलंय.