Nagpur मध्ये मुलगी आणि पत्नीची हत्या करुन पतीने सपवलं जीवन
नागपूरच्या (Nagpur Crime) एमआयडीसी पोलीस ठाण्या अंतर्गत अंगाचा थरकाप उडवणारा प्रसंग समोर आला आहे. पतीने अल्पवयीन मुलगी आणि पत्नीची हत्या करुन आत्महत्या (Suicide and Murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
नागपूर : नागपूरच्या (Nagpur Crime) एमआयडीसी पोलीस ठाण्या अंतर्गत अंगाचा थरकाप उडवणारा प्रसंग समोर आला आहे. पतीने अल्पवयीन मुलगी आणि पत्नीची हत्या करुन आत्महत्या (Suicide and Murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नागपुरातील राजीव नगर, तरोडा मोहल्ला परिसरात ही घटना घडल्याची माहिती आहे. पती विलास गवते याने 13 वर्षीय मुलगी आणि 45 वर्षीय पत्नी रंजना गवते यांचा खून केला. त्यानंतर स्वतःच्याही आयुष्याची अखेर केली. पत्नी आणि मुलीचा गळा कापल्यानंतर विलासने गळफास (Husband Hangs Self) लावून आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. कौटुंबिक वादातून विलास गवते याने टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे.
काय आहे प्रकरण?
नागपूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्या अंतर्गत राजीव नगर, तरोडा मोहल्ला परिसरात पतीने अल्पवयीन मुलगी आणि पत्नीची हत्या करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.