शिक्षकांच्या नावाखाली गुन्हेगार लढवत आहेत निवडणूक? बघा धक्कादायक आकडेवारी
नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत २२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत... पण हे शिक्षक आहेत की गुन्हेगार? या निवडणुकीत २२ पैकी १८ टक्के उमेदवारांवर गुन्हे
नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत २२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यामध्ये भाजप समर्थक शिक्षक परिषदेचे नागो गाणार, शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर अडबाले, आम आदमी पक्षाचे डॉ. देवेंद्र वानखेडे, बहुजन समाजचे निमा रंगारी या उमेदवारांचा समावेश आहे. मात्र शिक्षक आमदाराकीसाठी उभे असलेले तब्बल ५० टक्के उमेदवार शिक्षक नाहीत, १८ टक्के उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. तर निवडणुकीतील २७ टक्के उमेदवारांचे उत्पन्न २० लाखांपेक्षा जास्त असल्याची माहिती समोर आली आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार ३० जानेवारी रोजी नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होणार आहे. आयोगाच्या आदेशानुसार, गडचिरोलीत मतदानाची वेळ ७ ते ३, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात सकाळी ८ ते ४ पर्यंत वाजेपर्यंत मतदान होणार आहे तर २ फेब्रुवारीला लगेच मतमोजणी आणि निकाल जाहीर करण्यात येणार आहे.