Jhund: झुंडच्या कथेला क्रांतीकारी म्हणणं माझ्यासाठी आश्चर्यकारक- नागराज मंजुळे

Jhund: झुंडच्या कथेला क्रांतीकारी म्हणणं माझ्यासाठी आश्चर्यकारक- नागराज मंजुळे

| Updated on: Mar 07, 2022 | 2:23 PM

नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित ‘झुंड’ (Jhund) या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या चित्रपटाची कथा, त्यातील कलाकार आणि कलाकारांचं अभिनय अशा सर्वच विषयांवर सोशल मीडियावर बोललं जातंय.

नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित ‘झुंड’ (Jhund) या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या चित्रपटाची कथा, त्यातील कलाकार आणि कलाकारांचं अभिनय अशा सर्वच विषयांवर सोशल मीडियावर बोललं जातंय. नागपुरातील समाजसेवक विजय बारसे (Vijay Barse) यांनी केलेल्या यशस्वी प्रयोगावर या चित्रपटाची कथा बेतलेली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारी झोपडपट्टीतील मुलांची फुटबॉल टीम त्यांनी तयार केली. या चित्रपटावर विविध प्रतिक्रिया येत असतानाच आता खुद्द नागराज मंजुळे त्याविषयी व्यक्त झाले आहेत. “लोकांना हा फिल्म आवडतेय, याचा आनंद आहे. फेसबुकवर लोक स्वत:हून प्रतिक्रिया देत आहेत. न्यूयॉर्क, लंडन, युएईमधून बऱ्याच मित्रांचे, भारतीय लोकांचे मेसेज येतायत की त्यांना चित्रपट आवडतोय,” असं ते म्हणाले. ‘टीव्ही ९ मराठी’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते चित्रपटाच्या कथेविषयीही व्यक्त झाले. एका सर्वसामान्य माणसाची गोष्ट क्रांतीकारी कशी असू शकते, असं त्यांनी म्हटलंय.

Published on: Mar 07, 2022 02:23 PM