Sunetra Pawar : आता लोकसभा आणि राज्यसभेत नणंद भावजया?, अजितदादा सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवणार; सूत्रांचा दावा

Sunetra Pawar : आता लोकसभा आणि राज्यसभेत नणंद भावजया?, अजितदादा सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवणार; सूत्रांचा दावा

| Updated on: Jun 12, 2024 | 5:28 PM

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून लोकसभेत जोरदार प्रचार करण्यात आला. मात्र या निवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे अजित पवार यांनी आता सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

अजित पवार गटाकडून राज्यसभेसाठी अजित पवार यांच्याच पत्नी सुनेत्रा पवार यांचं नाव जवळपास निश्चित करण्यात आलं आहे, अशी माहिती सूत्रांनी टिव्ही ९ मराठीला दिली आहे. त्यामुळे आता लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही ठिकाणी नणंद भावजया दिसणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. थोड्याच वेळात राज्यसभेच्या उमेदवारीची घोषणा देखील करण्यात येणार आहे. अशातच राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्याचा शेवटचा दिवस असून राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांचं नाव जवळपास निश्चित झालं असल्याचे सांगितले जात आहे. तर नुकत्याच झालेल्या बारामती लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांची बहीण सुप्रिया सुळे यांच्याविरोधात पत्नी सुनेत्रा पवार यांना आपल्या पक्षाकडून अजित पवार यांनी लोकसभेची उमेदवारी दिली होती. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून लोकसभेत जोरदार प्रचार करण्यात आला. मात्र या निवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे अजित पवार यांनी आता सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Published on: Jun 12, 2024 05:28 PM