मुंबई विद्यापीठाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव द्या, कुणाची मागणी?
VIDEO | छत्रपती संभाजी महाराजांचा महापुरुषांच्या यादीत समावेश करण्यासह मुंबई विद्यापीठाला छत्रपती संभाजींच नावं द्या, सरकारकडे मागणी
पुणे : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील मुंबई विद्यापीठाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेने केली. यानंतर आता छत्रपती संभाजी महाराजांचा महापुरुषांच्या यादीत समावेश करा, यासह मुंबई विद्यापीठाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडकडून राज्य सरकारकडे करण्यात येत आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने संभाजी ब्रिगेडकडून मुंबई विद्यापीठाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. छत्रपती संभाजी महाराजांची आज १४ मे रोजी ३६६ वी जयंती साजरी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी मुंबई विद्यापीठाला छत्रपती संभाजी महाराजांच नावं देण्यासह छत्रपती संभाजी महाराजांचा महापुरुषांच्या यादीत समावेश करा, अशी मागणी केली आहे. ही मागणी मान्य केल्यास छत्रपती संभाजी महाराजांचा सन्मान होईल, अशी प्रतिक्रियादेखील संतोष शिंदे यांनी दिली आहे.