नाना पाटेकर यांनी स्पष्टच म्हटले, 'मी कुठल्या पक्षात टिकूच शकत नाही कारण...'

नाना पाटेकर यांनी स्पष्टच म्हटले, ‘मी कुठल्या पक्षात टिकूच शकत नाही कारण…’

| Updated on: Mar 06, 2024 | 5:33 PM

शेतकऱ्यांनी आपला निर्णय घेऊन सरकारला निवडून द्या, असे नाना पाटेकर यांनी म्हटले आहे. नाना पाटेकर नाशिकमध्ये म्हणाले, आता वेळ आली आहे की, शेतकऱ्यांनी काहीही मागू नये, तर देशात कोणाचे सरकार आणायचे आहे, हे ठरवावे.

नाशिक, ६ मार्च २०२४ : देशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर यांनीही आता एन्ट्री घेतली आहे. नाना पाटेकर यांनी मोठे विधान करत शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शविला आहे. शेतकऱ्यांनी आपला निर्णय घेऊन सरकारला निवडून द्या, असे नाना पाटेकर यांनी म्हटले आहे. नाना पाटेकर नाशिकमध्ये म्हणाले, आता वेळ आली आहे की, शेतकऱ्यांनी काहीही मागू नये, तर देशात कोणाचे सरकार आणायचे आहे, हे ठरवावे. यासोबतच त्यांनी राजकारणातील प्रवेशाबाबतही उत्तर दिले आहे. नाना पाटेकर म्हणाले, ‘सरकारकडे काय मागू नका तर कुठलं सरकार आणायचंय ते ठरवा. मला राजकारणात जाता येत नाही कारण जे पोटात आहे तेच ओठात येतं. दुसऱ्या दिवशी मला त्या पक्षातून मला काढून टाकतील आणि महिन्याभराने सर्व पक्ष संपलेले असतील. मग कशाला जायचं तिथं? असा उपरोधिकपणे सवालही नाना पाटेकर यांनी उपस्थितांसमोर केला. पुढे ते असेही म्हणाले की, शेतकरी बांधवांसमोर आम्ही मोकळेपणाने बोलू शकतो.’

Published on: Mar 06, 2024 05:33 PM