Nana Patekar Slaps Fan : व्हायरल झालेल्या ‘त्या’ व्हिडिओवर नाना पाटेकर यांचं स्पष्टीकरण; म्हणाले, मी स्वतः माफी…
नाना पाटेकरांनी टपली मारल्यामुळे नाना पाटेकर सध्या चांगलेच ट्रोल होत आहे. इतकेच नाहीतर त्यांचे काही चाहते आणि नेटकरी हे त्यांच्यावर नाराज देखील झाले. दरम्यान, या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर नाना पाटेकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. बघा नाना पाटेकर यांनी काय केला खुलासा
मुंबई, १६ नोव्हेंबर २०२३ | चाहत्याच्या डोक्याला चिडलेल्या नाना पाटेकरांनी टपली मारल्यामुळे नाना पाटेकर सध्या चांगलेच ट्रोल होत आहे. इतकेच नाहीतर त्यांचे काही चाहते आणि नेटकरी हे त्यांच्यावर नाराज देखील झाले. दरम्यान, या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर नाना पाटेकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. टपली मारण्याचं दृश्य हा चित्रपटातील सीन असल्याचे त्यांनी म्हटलं. नाना पाटेकर पुढे म्हणाले, आम्ही रिहर्सल केली होती. मागून एक मुलगा येतो आणि म्हणतो, ‘तुला ही टोपी विकायची आहे?’ मी टोपी घातली असताना त्याला मी टपली मारतो. मी म्हणतो, ‘उद्धटपणा थांबव, सभ्यपणाने वाग.’ आणि तो मुलगा तिथून पळून जातो. या सीनची एकदा रिहर्सल झाली होती. दिग्दर्शक म्हणाला, अजून एकदा करावं लागेल. व्हिडीओमधला हा मुलगा आत आला तेव्हा आम्ही नुकतीच सुरुवात केली होती. तर व्हिडिओच्या शेवटी नाना पाटेकर म्हणाले की, जर तो मुलगा त्यांच्यासमोर आला तर मी स्वतः त्याची माफी मागले.