या नशेडी व्यवस्थेत एका आमदाराचा मुलगा होता, पुणे कार अपघातावर बोलताना नाना पटोलेंचा रोख कुणावर?

या नशेडी व्यवस्थेत एका आमदाराचा मुलगा होता, पुणे कार अपघातावर बोलताना नाना पटोलेंचा रोख कुणावर?

| Updated on: May 28, 2024 | 4:57 PM

पुण्यातील हिट अँड रन प्रकरणात आरोपी अल्पवयीन मुलगा आणि त्याचे वडील यांच्यासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अशातच या घडलेल्या प्रकऱणावर राजकीय वर्तुळातील विरोधी नेते देखील सरकारवर निशाणा साधत आहे. पुणे कार अपघात प्रकरणावर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आपली भूमिका मांडली आहे.

पुण्यातील हिट अँड रन प्रकरण सध्या देशभरात चांगलंच चर्चेचा विषय़ ठरत आहे. पुण्यातील कल्याणीनगरमध्ये गेल्या आठवडाभरापूर्वी पोर्शे कारने दोन तरुणांना चिरडल्याची घटना घडली. या घटनेनंतर आरोपी अल्पवयीन मुलगा आणि त्याचे वडील यांच्यासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अशातच या घडलेल्या प्रकऱणावर राजकीय वर्तुळातील विरोधी नेते देखील सरकारवर निशाणा साधत आहे. पुणे कार अपघात प्रकरणावर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आपली भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, श्रीमंताच्या मुलांसाठी वेगळा कायदा आणि गरिबांच्या मुलांसाठी वेगळा कायदा, अशी परिस्थिती महाराष्ट्रात आहे, असं वक्तव्य करून नाना पटोले यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. पुढे नाना पटोले यांनी असेही म्हटले की, या नशेडी व्यवस्थेमध्ये एका आमदाराचा मुलगा होता, आणि ते ही जाहीर झालं पाहिजे. गाडीमध्ये उतरणारी लोकं दोन होती. ते दोघे कोण होते? यामध्ये एक मंत्री देखील आहे, तो कोण आहे? त्यांचं नाव देखील समोर आलं पाहिजे, असं म्हणत नाना पटोले यांनी हल्लाबोल केला आहे.

Published on: May 28, 2024 04:24 PM