पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीकेला काँग्रेस नेत्यांचं प्रत्युत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीकेला काँग्रेस नेत्यांचं प्रत्युत्तर

| Updated on: Feb 07, 2022 | 11:40 PM

'कोरोना काळातील आपल्या सरकारचे अपयश व केलेल्या चुका झाकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेस पक्षावर खोटे नाटे आरोप करत आहेत हे अत्यंत दुर्देवी आहे. देशातील जनता अडचणीत असताना काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते लोकांची मदत करत होते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र देशाची संपत्ती विकत होते. त्यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी काही देणेघेणे नाही ते स्वतःला देशाचे पंतप्रधान नाही तर भाजपचे प्रचारक समजतात', अशी घणाघाती टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि महाराष्ट्र सरकारवर जोरदार टीका केली. पंतप्रधानांच्या या टीकेला आता महाराष्ट्र काँग्रेसकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. कोरोना संकटाच्या काळात काँग्रेसकडून करण्यात आलेल्या मदतकार्याची यादीच काँग्रेसनं दिली आहे. त्याचबरोबर ‘कोरोना काळातील आपल्या सरकारचे अपयश व केलेल्या चुका झाकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेस पक्षावर खोटे नाटे आरोप करत आहेत हे अत्यंत दुर्देवी आहे. देशातील जनता अडचणीत असताना काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते लोकांची मदत करत होते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र देशाची संपत्ती विकत होते. त्यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी काही देणेघेणे नाही ते स्वतःला देशाचे पंतप्रधान नाही तर भाजपचे प्रचारक समजतात’, अशी घणाघाती टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य म्हणजे दुर्दैवी आहे. त्यांच्या पदाला शोभणार नाही, ज्यावेळेस करूनचे संकट होते, त्यावेळेला लाखोच्या संख्येने परप्रांतीय मजूर महाराष्ट्रात होते. आम्ही महाविकास आघाडी असो अथवा काँग्रेसच्या वतीने असो आम्ही या सर्वांची महाराष्ट्रात काळजी घेतली. त्यांची राहण्याची, जेवणाची व्यवस्था केली . त्यांचे तिकीट काढून दिली त्यांची काळजी घेतली ही वस्तुस्थिती आहे. याचं कौतुक पंतप्रधानांनी केलं असतं तर आम्हालाही बर वाटलं असतं असा टोला महसूलमंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे.