मोदी सरकारचं काऊंटडाऊन सुरू अन्... ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, नाना पटोलेंचं भाकित काय?

मोदी सरकारचं काऊंटडाऊन सुरू अन्… ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, नाना पटोलेंचं भाकित काय?

| Updated on: Mar 01, 2024 | 2:03 PM

राज्यात घाणेरडं राजकारण सुरू आहे. ते भूषणावह नाही असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तर विरोधीपक्ष म्हणून कमी पडत आहात का असा सवाल केला असताना नाना पटोले म्हणाले....

मुंबई, १ मार्च २०२४ : ओबीसी विरुद्ध मराठा, धनगर विरुद्ध आदिवासी हा प्रकार कुणामुळे सुरू झाला. राज्यात घाणेरडं राजकारण सुरू आहे. ते भूषणावह नाही असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तर विरोधीपक्ष म्हणून कमी पडत आहात का असा सवाल केला असताना पटोले म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांचा मी असाच एक इंटरव्ह्यू ऐकला. अजित पवार यांना सोबत घेणार नाही. नाही तर लग्न करणार नाही. कोण म्हणालं. नाना पटोले म्हणाले का? फडणवीसच म्हणाले ना…हा खोटारडेपणा त्यांचा आहे. आमच्याकडे खोटारडेपणा नाही. आम्ही सोनिया गांधींचे शिष्य आमच्या रक्तात त्याग आहे. इव्हेंट करणं नौटंकी करणं हे आमचं काम नाही. असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर टीका केली. पुढे त्यांनी असेही सांगितले की, यवतमाळच्या सत्तेत महिलांनी खुर्चीवर राहुल गांधींचे फोटो लावले. राहुल गांधी यांना सत्तेवर जाण्याचा निर्धार महिलांनी ठरवलं आहे. विदर्भात जे घडतं तेच देशात चमत्कार होतो. नरेंद्र मोदी सरकारचं काऊंटडाऊन सुरू झालं आहे. त्यांना सत्तेतून जावं लागेल. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असे म्हणत त्यांनी भाकित वर्तविलं आहे.

Published on: Mar 01, 2024 02:03 PM