पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामुळं मुंबईकरांचे हाल, नाना पटोले यांचा टोला
VIDEO | पंतप्रधान यांच्या दौऱ्यावरून नाना पटोले यांचा नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा
मुंबई : मविआमध्ये राहून राष्ट्रवादी आणि ठाकरे गटावर टीका का करता? यावर बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘टीव्ही 9 मराठी’च्या ‘महाराष्ट्राचा महासंकल्प‘ या विशेष कार्यक्रमात त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, मी राष्ट्रवादी काँग्रेस किंवा ठाकरे गट यांच्यावर कुठे टीका केली? तुम्ही अर्थाचा अनर्थ लावता. मी आता संजय राऊत यांचं कौतुक केलं. महाविकास आघाडीत बिघाडी असं तुम्हाला का वाटतं? ते कळत नाही. भाजपचं काहीच कुणाला दिसत नाही. आता मी तुमच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, पंतप्रधान मुंबईत आले की काही जणांना अॅसिडीटी होते. आता त्यांनी मला वाक्य दिलं. पंतप्रधान दोनदा आले. नरेंद्र मोदी मुंबईत आल्यावर मुंबईकरांचे हाल होतात का? असं तुम्ही मुंबईकरांना विचारलं का? आम्ही नरेंद्र मोदी यांचं स्वागतच करतो. आम्हाला आनंदच होतो. पण यानिमित्ताने मुंबईकरांचे बेहाल होतात. त्याची काळजी कुणी घ्यावी? मुंबईकरांना अॅसिडिटी होते म्हणणं. मुख्यमंत्र्यांचं म्हणण्याकडे बघाना.. असे ते म्हणाले.