“महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा”, काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी
राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा एकदा लांबणीवर गेला आहे. पावसाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. मात्र राज्यात मंत्रिमंडळ विस्तारावरून आणि खातेवाटपावरून मोठ्या घडामोडी घडत आहे. याच पार्शभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नागपूर: राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा एकदा लांबणीवर गेला आहे. पावसाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. मात्र राज्यात मंत्रिमंडळ विस्तारावरून आणि खातेवाटपावरून मोठ्या घडामोडी घडत आहे. याच पार्शभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “राज्यातील जनतेला अलीबाबा चालीस चोर या कथेची आठवण व्हायला लागलीय. महाराष्ट्रातील सरकारल जनतेच्या प्रश्नाशी घेण-देण नाही.जनतेच्या पैशांची लूटमार केली जात आहे. जनता उपशी आणि सरकार तुपाशी असं राज्यात सुरु आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार न होणं म्हणजे जनतेच्या पैशावर डल्ला मारण्याचं काम आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था नाही. राज्यपालांनी हस्तक्षेप करत तातडीने राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे.”
Published on: Jul 13, 2023 02:20 PM