हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?

हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?

| Updated on: Apr 30, 2024 | 2:35 PM

‘मी कुणाच्या नादी लागत नाही, कुणाचं वाईट चिंतत नाही, परंतु माझ्याशी विश्वासघात केला की त्यांचा सत्यनाश होतो’, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ब्राम्हणांचा शाप आता लागत नाही. ते ओरिजनल नाही तर मटण खाणारे ब्राम्हण आहेत.' देवेंद्र फडणवीस यांच्यावर कुणी केला पलटवार?

‘मी कुणाच्या नादी लागत नाही, कुणाचं वाईट चिंतत नाही, परंतु माझ्याशी विश्वासघात केला की त्यांचा सत्यनाश होतो’, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं. अकलूज येथे जाहीर सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला होता. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या वक्तव्यावर नाना पटोले यांनी पलटवार यांनी केला आहे. ‘ब्राम्हणांचा शाप आता लागत नाही. ते ओरिजनल नाही तर मटण खाणारे ब्राम्हण आहेत.’, असे म्हणत नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. नाना पटोले असेही म्हणाले की देवेंद्र फडणवीसांच्या शापाला अर्थ नाही. यासह २०१४ ला सत्तेत येण्यासाठी जी काही आश्वासनं दिली होती. जसं की, मराठे-धनगर विविध समाजाला न्याय देऊ… त्यांचं काय झालं.. ज्यांनी महाराष्ट्राचा सत्यानाश केला. शाहू-फुले-आंबेडरांच्या विचारांना काळीमा लावला, अशा देवेंद्र फडणवीस यांना हे बोलण्याचा आणि असा शाप देण्याचा अधिकार नाही, असेही पटोले म्हणाले.

Published on: Apr 30, 2024 02:35 PM