VIDEO : ‘मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना रिपोर्ट जातो’, Nana Patole यांचा मविआतील पक्षांवरच गंभीर आरोप
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “महाराष्ट्रात काँग्रेस उभी राहत आहे हे त्यांना माहीत आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “महाराष्ट्रात काँग्रेस उभी राहत आहे हे त्यांना माहीत आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे. मी कुठे काय करतो ते सगळं त्यांना माहीत आहे”, असं म्हणत नाना पटोले यांनी आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप केला आहे. ते काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित होते.
नाना पटोले म्हणाले, “त्यांच्याकडे गृहमंत्री आणि मुख्यमंत्रिपद आहे. त्यामुळे यंत्रणांना सर्व रिपोर्ट त्यांना द्यावे लागतात. कुठे कुठे काय चालू आहे, आंदोलन कुठे काय चालू आहे, हे सगळं त्यांना अपडेट द्यावे लागतात. मी कुठे काय करतो ते सगळं त्यांना माहीत आहे. महाराष्ट्रात काँग्रेस उभी राहत आहे हे त्यांना माहीत आहे.
Latest Videos